महाराजांची स्थापना

            कामाठीपुराचा महाराजाची स्थापना सन १९५३ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मंडळ है एकत्र आहे पण पूर्वी येथे वेगवेगळे गट होते खूप हिंनसा होती सर्वांनी एकत्र यावे एक नवनिर्माण होण्यासाठी सर्व बंधूभावानी नवस केला व श्रीची स्थापना झाली.  

            जसाजसा काळ बदलत चालला तशीतशी प्रसिद्धी वाढत चालली. सन १९९९ यावर्षी श्री ला नवसाला पावणारा कामाठीपुराचा महाराजा संबोधले गले. सन २००२ साली महाराजाचे सुवर्णा मोहोस्तव साजरा करण्यात आले. सन २००३ पासून पुन्हा एकदा नवीन पिढीने मंडळाचा कार्यभार हाती घेऊन मागील पिढीने सुरु केलेले कार्य जोमाने पुढे चालू आहे



           सन २०१२ महाराजाचे हिरक मोहोस्तव आहे यावर्षी मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री. शिवकुमार एडिवार ,किशोरे चाकीला ,राजेश गीरोल्ला ,दिनेश बिल्ला विजय माय्त्री , गणेश बिल्ला .राहुल पुपाला, जितेश गोहिल रुकेश गीरोल्ला रोहित व प्रशांत या प्रभुतींनी प्रामुख्याने मंडळाची धुरा सांभाळली जाणार आहे. 

          बदलत्या काळानुरुप मंडळाने 2010 साली http://kamathipura.org/ orhttp://kamathipura8.blogspot/ या वेबसाईट सुरु केल्या. मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री. शिवकुमार एडिवार ( यांच्या संकल्पतेने व प्रयत्नाने ही वेबसाइट तयार झाली. मंडळाची माहिती, मंडळाचे सामाजिक उपक्रम व कामाठीपुराचा महाराजाची छायाचित्रे वेबसाइट वर उपलब्ध आहेत. दूर रहाणाऱया भाविकांसाठी ही वेबसाईट फारच उपयुक्त आहे.